Prakash Shendge : ओबीसींचा स्वतंत्र नवा पक्ष निर्माण करण्याची घोषणा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPrakash Shendge : ओबीसींचा स्वतंत्र नवा पक्ष निर्माण करण्याची घोषणा
ओबीसी कार्यकर्ते आणि नेते यांच्यातील बैठकीत ओबीसींचा स्वतंत्र नवा पक्ष निर्माण करावा असं मत झालं असल्याची प्रतिक्रिया ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिलीय. काल ओबीसी कार्यकर्ते आणि नेते यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला. तसंच ज्यांनी आमच्या मतांवर डल्ला मारलाय त्यांना घरचा रस्ता दाखवणं गरजेचं असल्याचं मतही प्रकाश शेंडगेंनी सांगितलं. तर आगामी लोकसभा निवडणूक आमचा नवा पक्ष लढणार असल्याची माहितीही शेंडगेंनी दिली. या निवडणुकीत आमचा पक्ष ४८ जागा लढवणार असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. तसंच महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांची बोळवण एकाद-दोन जागांवर होण्याची शक्यता आहे.. जर आंबेडकर आमच्यासोबत आले तर जास्त जागा मिळतील असंही शेंडगे .यावेळी म्हणालेत