एक्स्प्लोर
Prakash Ambedkar On Protest: 'अधिकाऱ्यांच्या नाही, राजकीय पक्षांच्या गाड्या फोडा'; आंबेडकरांचे वादग्रस्त आवाहन
वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शेतकरी आणि बेरोजगार आंदोलकांना उद्देशून केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 'तुम्ही अधिकाऱ्यांना बडवून काय करणार आहात? अधिकारी निर्णय घेत नाही, तर राजकीय पक्ष घेतात,' असे आंबेडकर म्हणाले. आंदोलनादरम्यान सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडण्याऐवजी थेट निर्णय घेणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाड्या फोडा, असे वादग्रस्त आवाहन त्यांनी केले आहे. अधिकारी केवळ निर्णयांची अंमलबजावणी करतात, त्यामुळे त्यांना लक्ष्य करून काहीही साध्य होणार नाही, असेही ते म्हणाले. नेपाळ आणि लडाखमधील आंदोलनांचा दाखला देत, महाराष्ट्रातील तरुणांनी तसे केल्यास परिस्थिती सुधारेल आणि त्यांना रोजगार मिळेल, असेही आंबेडकर यांनी सूचित केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
सांगली
राजकारण
Advertisement
Advertisement

















