Jalgaon : अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर अतिक्रमण धारकांचा हल्ला, जामनेर तालुक्यातील घटना
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर अतिक्रमण धारकांनी हल्ला केल्याची घटना काल जामनेर तालुक्यातील लोणी गावात घडली असून या घटनेची क्लिप सोशल मीडियावर वाय रल झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जामनेर तालुक्यातील लोणी गाव परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात असलेले अतिक्रण ग्राम पंचायती कडून काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. यावेळी अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढण्यासाठी आपला तीवर विरोध दर्शविला होता,अतिक्रमण धारकांचा वाढता विरोध पाहता पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात पोलिसांना अपयश आल्याचं दिसून आले. अतिक्रमण धारकांना समजाऊन सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना अतिक्रमण धारकांनी शिवीगाळ आणि धक्का बुक्की करण्यास सुरुवात केली.