Narendra Modi Vikrant: विक्रांत पाकिस्तानची झोप उडवणार: पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात आयएनएस विक्रांतवर (INS Vikrant) जवानांसोबत दिवाळी साजरी केली, तर दुसरीकडे मुंबईत चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी भाजपला (BJP) जाहीर पाठिंबा दिला. 'मी मोदीजींचा भक्त असून भाजप म्हणजे माझं घर असल्याचं,' विधान महेश कोठारे यांनी केले. आयएनएस विक्रांतवर नौसैनिकांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. ‘विक्रांतने आपल्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती,’ असे ते म्हणाले. २०१४ पासून पंतप्रधान प्रत्येक वर्षी जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत आणि ही परंपरा त्यांनी यावर्षीही कायम ठेवली. दुसरीकडे, मुंबईतील मागाठाणे येथील दिवाळी पहाट कार्यक्रमात बोलताना, महेश कोठारे यांनी आपण मोदींचे भक्त असल्याचे सांगितले आणि मुंबईत कमळ फुलेल असा विश्वास व्यक्त केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement