एक्स्प्लोर
Maharashtra Live : महाराष्ट्र लाईव्ह सुपरफास्ट न्यूज : 08 Oct 2025 : 5 PM : ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, तसेच अदानी उद्योग समूहाचे गौतम अदानी आणि जपानचे राजदूत उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी विमानतळाची पाहणी केली आणि डिसेंबर महिन्यात हे विमानतळ कार्यान्वित होईल असे सांगितले. उद्घाटनानंतरच्या भाषणात मोदींनी देशातील वेगवान विकास कामांचा उल्लेख केला आणि सध्या भारतात १६० पेक्षा अधिक विमानतळे असल्याचे नमूद केले. विमानतळांमुळे या भागात गुंतवणूक वाढेल आणि किसान, मच्छीमार यांचे उत्पाद ग्लोबल मार्केटपर्यंत पोहोचेल असेही ते म्हणाले. मोदींनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. 'देश में ऐसी राजनीतिक धारा भी रही है, जो जनता की सुविधा नहीं, सत्ता की सुविधा को ऊपर रखती है। ये वो लोग हैं, जो विकास के काम में रुकावट डालते हैं, घोटाले, घपले करके विकास से जुड़े प्रोजेक्ट्स को पटरी से उतार देते हैं। दशकों तक देश ने ऐसे नुकसान को देखा।' असे मोदी म्हणाले. काँग्रेसने दहशतवादासमोर गुडघे टेकले आणि त्यांच्या कमजोरीमुळेच दहशतवाद्यांना मजबूती मिळाली असा हल्लाबोलही मोदींनी केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा असल्याचे म्हटले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय निश्चित झाल्याचे दिसते. विमानतळाच्या बाहेर स्थान फलकावर 'दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नमूद करण्यात आले आहे. दिबा पाटील यांचा मुलगा अतुल पाटील यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त केला. प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात या विमानतळाला केंद्रीय कॅबिनेटमध्ये मान्यता मिळाल्याचे सांगितले आणि महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीत वाढ होईल असे भाकीत केले. नवी मुंबई विमानतळावर इमिग्रेशन चेकपोस्टसाठी २८५ नव्या पदांना परवानगी देण्यात आली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
करमणूक
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement


















