PM Modi Mumbai Visit | विकासाचा टेक ऑफ, मुंबईला दोन गिफ्ट

Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यात दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. नवी मुंबई विमानतळाचा आकार कमळाच्या फुलासारखा आहे. संस्कृतीचे हे जिवंत प्रतीक आहे अशी भावना व्यक्त करण्यात आली. मेट्रो तीनच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या मार्गात अडथळे आणणाऱ्यांवर हल्लाबोल केला. "काही लोक विकासाच्या मार्गात अडथळे आणतात" असे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई वसवण्याची घोषणा केली. विमानतळाजवळ तिसरी मुंबई आणि वाळवड बंदराजवळ चौथी मुंबई वसवण्याची घोषणा फडणवीसांनी केली. लोकनेते भूमिपुत्र दिबा पाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचा टेकऑफ होताना दिसला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola