Phaltan Doctor Death: 'जयकुमार गोरे चारित्र्य ठरवणार का?', अंधारेंचा संतप्त सवाल
Continues below advertisement
फलटण (Phaltan) येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) आंदोलन करत पोलिसांना धारेवर धरले. यावेळी त्यांनी रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. 'जयकुमार गोरे चारित्र्य ठरवणार का? चाकणकर आणि जयकुमार गोरे यांनी स्वतःला तपासावं एकदा, मग दुसऱ्याच्या लेकरावर शिंतोळे उडवावे,' असा घणाघात अंधारेंनी केला. DYSP राहुल धस, मेडिकल सुपरिटेंडंट डॉ. अंशुमन धुमाळ, API जायपत्रे आणि PSI पाटील यांच्यावर आरोपपत्र का दाखल झाले नाही, असा सवाल करत पोलीस प्रशासनावर आरोपींना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. पीडितेचा CDR कोणी लीक केला आणि इन-कॅमेरा पोस्टमॉर्टम का केले नाही, यावरही त्यांनी पोलिसांना जाब विचारला. यावर तपास सुरू असून, या टप्प्यावर अधिक माहिती देता येणार नाही, असे उत्तर उपस्थित पोलीस अधिकाऱ्याने दिले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement