Phaltan Doctor Case : महिला डॉक्टरचा मृत्यू, राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल Special Report

Continues below advertisement
फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी राजकीय वातावरण तापले असून, आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांना अटक करण्यात आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, खासदार प्रणिती शिंदे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी आवाज उठवला आहे. 'ही आत्महत्या नाही, ही संस्थात्मक हत्या आहे,' असे म्हणत राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फोनवरून कुटुंबाला धीर दिला. पीडितेच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलिसांच्या तपासावर अविश्वास दाखवत, महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी (SIT) चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola