एक्स्प्लोर
Phaltan Doctor Case : 'आम्ही तुमच्या पाठीशी आहोत', मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांना Rahul Gandhi यांचा फोन
फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पीडितेच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला आहे. राहुल गांधी यांनी 'तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत' असे आश्वासन दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या संवादावेळी काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) हे देखील उपस्थित होते आणि त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबीयांनी या प्रकरणात SIT चौकशीची आणि आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे पोलीस योग्य तपास करत नाहीत, असा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या तरुणीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत एका पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा आणि मानसिक छळाचा गंभीर आरोप केला होता.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

















