एक्स्प्लोर
Phaltan Doctor Politics: डॉक्टर मृत्यू प्रकरण, फडणवीसांकडून निंबाळकरांना क्लीन चिट? Special Report
फलटणमधील (Phaltan) महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे (Doctor Suicide) महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर (Ranjitsinh Nimbalkar) यांच्यावर झालेल्या आरोपांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 'मुख्यमंत्री तपास अधिकारी झाले का?', असा थेट सवाल अंबादास दानवे यांनी विचारला आहे. फडणवीस यांनी निंबाळकर यांच्यासोबत फलटणमधील कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थिती लावत त्यांना एकप्रकारे क्लीन चिट दिली. 'रणजित दादांवर किंचितही शंका असती तर कार्यक्रमाला आलो नसतो,' असे फडणवीस म्हणाले. तसेच, 'प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे राजकारण कोणी करू नये,' असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला. यावरून विरोधी पक्षांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून, या प्रकरणाच्या निःपक्षपाती चौकशीची मागणी केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
यवतमाळ
व्यापार-उद्योग
क्रीडा
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















