PSI Viral Video: 'वर्दी नसताना रस्त्यावर गाड्यांची तपासणी', PSI Gopal Badane चा जुना व्हिडिओ व्हायरल

Continues below advertisement
फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण (Phaltan Doctor Suicide Case) आणि त्यातील मुख्य आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक (Suspended PSI) गोपाल बदने (Gopal Badane) पुन्हा चर्चेत आले आहेत. बदनेचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो 'वर्दीवर नसताना रस्त्यावर गाड्या अडवून चालकांची विचारपूस करत' असल्याचे दिसत आहे. फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी गोपाल बदने सध्या पोलीस कोठडीत आहे. हा व्हिडिओ कधीचा आहे, याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही, परंतु यामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बदनेवर बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola