एक्स्प्लोर
Phaltan Doctor Case : मुख्य आरोपी गोपाल बदने फलटण पोलीस स्टेशनमध्ये हजर
फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने (PSI Gopal Badane) आणि त्याचा सहकारी प्रशांत बनकर (Prashant Bankar) यांच्याभोवती तपास केंद्रित झाला आहे. मृत डॉक्टर महिलेने तिच्या हातावर लिहिलेल्या नोटमध्ये पीएसआय गोपाळ बदने याने चार वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला होता. फलटण पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर बदने याने 'मी प्रामाणिक आहे, पोलिस प्रशासनावरती विश्वास आहे,' अशी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात, मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप असलेला दुसरा आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केली असून, त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बदने याला शोधण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली होती आणि त्याचे शेवटचे लोकेशन पंढरपूर येथे आढळले होते. अखेरीस, तो स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला, ज्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
नाशिक
क्रिकेट
Advertisement
Advertisement

















