एक्स्प्लोर
Phaltan Doctor Case : 'मी प्रामाणिक, प्रशासनावर विश्वास', आरोपी Gopal Badane अखेर पोलिसांसमोर हजर
सातारा जिल्ह्यातील फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टर आत्महत्या (Doctor Suicide) प्रकरणातील मुख्य आरोपी, निलंबित पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने (Gopal Badane) अखेर पोलिसांसमोर हजर झाला आहे. वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना, 'मी प्रामाणिक आहे, पोलीस प्रशासनावर विश्वास आहे', अशी प्रतिक्रिया गोपाळ बदने याने ABP माझाशी बोलताना दिली. मृत डॉक्टर महिलेने आत्महत्येपूर्वी तिच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये PSI गोपाळ बदने याने तिच्यावर चार वेळा बलात्कार (Rape) केल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर बदने फरार होता, तर दुसरा आरोपी प्रशांत बनकर याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. बदने स्वतःहून फलटण पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर, त्याला वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याने माध्यमांशी संवाद साधला.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















