Phaltan Doctor Case: 'PSI बदनेवर बलात्काराचा आरोप, निंबाळकरांनी धमकावलं का?'; प्रकरण तापलं
Continues below advertisement
फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने, प्रशांत बनकर, पोलीस निरीक्षक अनिल महाडिक आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची नावे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. 'PSI गोपाळ बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला', असा गंभीर आरोप महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे. यासोबतच, प्रशांत बनकरवर मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप आहे, तर पोलीस निरीक्षक अनिल महाडिक यांच्यावर तक्रार दाबल्याचा संशय आहे. खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि त्यांच्या दोन स्वीय सहाय्यकांनी महिलेला धमकावल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, आरोग्य आणि पोलीस प्रशासनात हस्तक्षेप केल्याचाही संशय आहे. डॉक्टर धुमाळ यांनी महिला डॉक्टरच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचेही समोर आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement