Phaltan Doctor : 'महाराष्ट्राच्या लेकीला न्याय द्या', Sule, Sonawane आता Amit Shah यांना भेटणार
Continues below advertisement
फलटण (Phaltan) येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरण आता थेट दिल्ली दरबारी पोहोचले आहे. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत. सुप्रिया सुळे यांनी पीडित डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर, 'राजकारण बाजूला ठेवून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा', अशी भूमिका मांडली. त्यांनी या प्रकरणाचा तपास निवृत्त न्यायाधीशांमार्फत विशेष तपास पथक (SIT) नेमून करण्याची मागणी केली आहे. या भेटीत खासदार बजरंग सोनवणे प्रकरणाची सविस्तर माहिती गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मांडतील, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात कॉल डेटा रेकॉर्ड (CDR) लीक झाल्याबद्दलही सुळे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement