एक्स्प्लोर
Phaltan Doctor Case : 'दोन्ही आरोपींना फाशी द्या', मृत Doctor च्या कुटुंबीयांची मागणी
फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी (Doctor Suicide Case) खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकर (Prashant Bankar) याला अटक झाली असून, मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने (Gopal Badne) फरार आहे. 'दोन्हीही आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या वैद्यकीय अधिकारी लेकराला न्याय मिळाला पाहिजे,' अशी मागणी करत पीडित डॉक्टरच्या कुटुंबीयांनी आक्रोश व्यक्त केला आहे. सुसाईड नोटमध्ये (Suicide Note) PSI बदनेवर बलात्काराचा आणि बनकरवर शारीरिक व मानसिक छळाचा गंभीर आरोप आहे. बदनेचे शेवटचे लोकेशन पंढरपूरमध्ये (Pandharpur) आढळले असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर, बनकरला पुण्यातील (Pune) एका फार्महाऊसमधून अटक करण्यात आली. पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी राजकीय दबाव असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















