Phaltan Doctor Case: 'कोणालाही सोडणार नाही', Devendra Fadnavis यांचं कठोर कारवाईचं आश्वासन
Continues below advertisement
साताऱ्यातील फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर कठोर भूमिका घेतली आहे. 'जे कुणी सहभागी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल,' असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलंय. या प्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, या संवेदनशील घटनेचे राजकारण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनाही सुनावले आहे. सरकार पीडितेच्या कुटुंबीयांच्या पाठीशी असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement