एक्स्प्लोर
TOP 100 Headlines : 10 AM : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 OCT 2025 : ABP Majha
पलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे राज्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणी आरोपी प्रशांत बंकरला अटक करण्यात आली आहे. या घटनेवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'गृहमंत्री म्हणून फडणवीस नापास आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा,' अशी मागणी दानवे यांनी केली आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपाबाबत भाजप १५० जागांवर उमेदवार उतरवण्यास इच्छुक असून शिंदे गटाला ६५ ते ७५ जागा देण्यावर विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, आमदार रोहित पवार यांनी नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळ्याप्रकरणी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचा वनविभागाचा अहवाल समोर आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांना जुन्या सहकाऱ्यांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















