एक्स्प्लोर
Phaltan Doctor : 'आरोपीला फाशी द्या', मृत Doctor च्या कुटुंबीयांचा आक्रोश; पोलिसांवर गंभीर आरोप
फलटणमधील एका महिला डॉक्टरच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबीयांनी हे आत्महत्येचे नसून हत्येचे प्रकरण असल्याचा आरोप केला आहे. कुटुंबीयांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, आरोपींना पाठीशी घातल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'मुळात त्यांनी आमची बाजू ऐकून न घेता सरळसरळ आरोपींना समर्थन दर्शवलं आहे,' असा आरोप मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांनी केला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपी दत्तात्रय व्यंकट निंबाळकर याला लवकरात लवकर अटक करून फाशी देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाला राजकीय वळण लागले असून, आरोपीचा भाऊ भाजपचा पदाधिकारी असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरही आरोप होत असून, त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
नागपूर
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















