Phaltan Doctor Case: 'प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाऊ देणार नाही', Fadnavis यांचा थेट इशारा

Continues below advertisement
फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून राजकारण तापले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'मुख्यमंत्री महोदय तपास अधिकारी झाले का?,' असा थेट सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. फलटण येथील सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) आणि सचिन पाटील यांना क्लीन चिट दिली. या प्रकरणात त्यांचे नाव विनाकारण गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचे फडणवीस म्हणाले. 'प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल तर ते सहन करणार नाही,' असा इशाराही त्यांनी दिला. यावर दानवे यांनी टीका करत, मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाच्या लोकांना क्लीन चिट देण्याऐवजी या प्रकरणाची निष्पक्ष अधिकाऱ्याकडून चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अशा वक्तव्यामुळे प्रशासनाचे मनोबल खच्ची होत असल्याचेही दानवे म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola