Petrol Diesel : साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल डिझेल महागलं, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Continues below advertisement

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी... पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमुळे रोखून धरलेली इंधन दरवाढ अखेर सकाळपासून लागू झालीय. साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल डिझेल महागलंय. पेट्रोल प्रतिलिटर 84 पैसे तर डिझेल प्रतिलिटर 83 पैशांनी महाग झालंय. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरेल 112 डॉलरवर पोहोचलीय. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालीय. गेल्या 4  नोव्हेंबरनंतर पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram