एक्स्प्लोर
Pawar vs Pawar: 'अजित पवारांचं धक्कातंत्र', Baramati नगराध्यक्ष पदासाठी चिरंजीव Jay Pawar मैदानात उतरणार?
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे धाकटे चिरंजीव जय पवार (Jay Pawar) राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 'जय पवार हे बारामती नगरपरिषदेची नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवतील'. यामुळे बारामतीमध्ये (Baramati) पुन्हा एकदा 'पवार विरुद्ध पवार' (Pawar vs Pawar) असा संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार (Sharad Pawar) गट जय पवारांविरोधात कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जय पवार राजकारणात आले, तर ते पवार कुटुंबातील आठवे सदस्य असतील जे राजकारणात सक्रिय होतील. याआधी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, रोहित पवार, युगेंद्र पवार आणि पार्थ पवार यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
राजकारण
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

















