Maharashtra: स्थानिक निवडणुकीसाठी Pawar काका-पुतणे एकत्र? Pimpri-Chinchwad मध्ये दोन्ही गटांची तयारी
Continues below advertisement
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याचे संकेत मिळत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता आहे. NCP (SP) आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) दिलेल्या संकेतानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटानेही एकत्र लढण्याची तयारी दर्शवली आहे. अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी म्हटले आहे की, 'एका घरामध्ये जर भिंत पडत असेल आणि कुटुंब एकत्र येत असेल तर ह्यापेक्षा वेगळा आनंद काय होणार?' भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही गट एक पाऊल मागे घेण्यास तयार असल्याचे यातून सूचित होते. जागावाटपाचा अंतिम निर्णय अजित पवार घेतील, पण जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement