Past Forward: 'लहानपणापासून किल्ला करायची आवड', Pune च्या 71 वर्षीय आजोबांनी साकारले London Bridge
Continues below advertisement
पुण्यातील हेमंत जोगदेव या ७१ वर्षीय आजोबांनी दिवाळीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची प्रतिकृती साकारण्याच्या परंपरेला आधुनिकतेची जोड दिली आहे. 'अगदी लहानपणापासून किल्ला करायची मला आवड आहे,' असे सांगत जोगदेव यांनी आपली ही कला सादर केली आहे. त्यांनी केवळ मातीचा किल्ला न बनवता त्यासमोर थर्मोकोलच्या साहाय्याने एका आधुनिक शहराची प्रतिकृती उभारली आहे. यामध्ये लंडन ब्रिज, पिसाचा झुकता मनोरा आणि बिग बेन क्लॉक टॉवर यांसारख्या प्रसिद्ध वास्तूंचा समावेश आहे. भावी पिढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गड-किल्ल्यांचे महत्त्व रुजावे, तसेच त्यांना आधुनिक जगाची ओळख व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ही अनोखी कलाकृती पाहण्यासाठी पुणेकर गर्दी करत आहेत. कॅमेरामन विजय राव यांच्यासह नाझीम मुल्ला, एबीपी माझा, पुणे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement