Parth Pawar Land Deal: पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप, अजित पवार अडचणीत?

Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या कंपनीवर जमीन खरेदीत घोटाळा केल्याच्या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 'माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचे करत असेल किंवा नियमात न बसणारे काम करत असेल तर त्याला माझा पाठिंबा नसेल,' अशी स्पष्ट भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे. शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे यांनी आरोप केला आहे की, पार्थ पवार यांच्या Amedia Enterprises कंपनीने पुण्यात तब्बल १८०० कोटी रुपयांची सरकारी जमीन केवळ ३०० कोटी रुपयांत खरेदी केली. या गंभीर आरोपांची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून, याला 'प्राथमिकदृष्ट्या गंभीर' म्हटले आहे. या प्रकरणात एका तहसीलदाराला निलंबितही करण्यात आले आहे. या घडामोडींमुळे सत्ताधारी महायुतीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत असून राजकीय वातावरण तापले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola