एक्स्प्लोर
Parbhani Horror: तरुणीवर सामूहिक अत्याचार करून Video काढला, Jintur प्रकरणातील ५ आरोपींना अटक
परभणी (Parbhani) जिल्ह्यातील जिंतूर (Jintur) तालुक्यामधील इटोली (Itoli) गावात एका महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. 'या प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींना न्याय मिळवून दिला जाईल', असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे. ही धक्कादायक घटना १४ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली, जेव्हा पीडित तरुणी तिच्या मित्रासोबत बसली होती. त्यावेळी सहा आरोपींनी त्यांना अडवून, तरुणीकडील ५,००० रुपये हिसकावले आणि तिला ओढत नेत तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. इतकेच नाही, तर आरोपींपैकी एकाने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित करून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडितेने जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी करण बुरकुले, शेषराव शेवाळे, शेख साबिर शेख सत्तार, करण मोहिते आणि दोन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पाच जणांना अटक केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















