एक्स्प्लोर
Mumbai Crime : 'बायकोने केला Video Shoot', विमा मॅनेजर Pradip Narale ने महिला सहकाऱ्यावर केला बलात्कार
पनवेलमध्ये एका धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, जिथे एका विमा कंपनीचा व्यवस्थापक प्रदीप नामदेव नरळे याने आपल्या महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार करून लाखो रुपयांची खंडणी उकळली. पोलीस तपासात उघड झाले आहे की, आरोपीने जेवणातून गुंगीचे औषध दिल्यानंतर पीडितेवर बलात्कार केला आणि त्याचे चित्रीकरण त्याच्या पत्नीनेच केले. अंधेरीतील एका विमा कंपनीत शाखा व्यवस्थापक असलेल्या प्रदीप नरळेने नागपूर शाखेत काम करणाऱ्या आपल्या महिला सहकाऱ्याशी ऑनलाईन ओळख निर्माण केली होती. कामानिमित्त मुंबईत आल्यावर त्याने पीडितेतेला पनवेलमधील घरी जेवायला बोलावले. तिथे गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला आणि पत्नी रेणुका नरळेच्या मदतीने त्या घटनेचा व्हिडिओ बनवला. या व्हिडिओच्या आधारे त्याने पीडितेकडून लाखो रुपये उकळले. पनवेल शहर पोलिसांनी प्रदीप नरळेला अटक केली आहे, तर त्याची पत्नी रेणुका आणि भाऊ प्रवीण नरळे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement

















