Pankaja Munde : ...नंतर माझं तिकीट रद्द केलं, पंकजा मुंडे यांचा गौप्यस्फोट ABP Majha
abp majha web team
Updated at:
07 Jul 2023 05:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPankaja Munde PC : "मी कायमच पक्षाचा आदेश अंतिम मानला आहे. मी पक्षाच्या विरोधात जात नाही मग माझ्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित का केले जातात?" असा सवाल उपस्थित करत "माझ्या नैतिकतेवर प्रश्न निर्माण करणे हे माझ्यासाठी दु:खद आहे," अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिली. "मला राजकारणातून ब्रेक हवा आहे. सध्याच्या राजकाराणाचा कंटाळा आल्यामुळे दोन महिने राजकारणातून सुट्टी घेत आहे," असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. मुंबईतील (Mumbai) पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे बोलत होत्या.