Zero Hour : बीडमध्ये मुंडे बहीण-भाऊ एकत्र, राजकीय वारसा कोणाचा?
Continues below advertisement
गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदारावरून सुरू असलेल्या चर्चेला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत त्यांच्या कन्या पंकजा मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे. 'वेळ आली तेव्हा दिग्गज नेत्यांनी पुत्रप्रेम किंवा कन्याप्रेमाला झुकतं माप दिलेलं महाराष्ट्रानं पाहिलंय.' बीडमधील एका कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडेंचे खरे राजकीय वारसदार असल्याचे विधान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकेकाळी एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले पंकजा आणि धनंजय मुंडे आता राजकीय अपरिहार्यतेमुळे एकत्र आले आहेत. गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आजही पंकजा मुंडे यांच्यामध्ये आपल्या नेत्याची झलक पाहतो, त्यामुळे त्यांचा प्रभाव कायम आहे. मात्र, आता दोन्ही बहीण-भाऊ एकत्र आल्याने या युतीचा त्यांना आणि त्यांच्या मतदारसंघाला कसा फायदा होतो, यावरच त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement