Pandharpur : पाच वर्षात मिळणार विठ्ठल मंदिराला 700 वर्षापूर्वीचे स्वरूप : ABP Majha
Continues below advertisement
७०० वर्षांपूर्वीचं विठ्ठल मंदिर आता भाविकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. पण त्यासाठी पुढची ५ वर्ष भाविकांना वाट पाहावी लागणार आहे. विठ्ठल मंदिराच्या आधुनिकीकरण आणि त्याचवेळी दगडी बांधकामाबाबत पुरातत्व खात्यानं ६२ कोटींचा आऱाखडा बनवला. हा आराखडा मंदिर समितीनं मंजूर केलाय. आता हा आराखडा मंजुरीसाठी विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आलाय. त्यानुसार रखुमाई केमिकल कन्झर्वेशन अर्थात रासायनिक संवर्धन, मंदिराचं मजबुतीकरण, विठ्ठल मूर्तीला हानिकारक असणारं गाभाऱ्यातील ग्रॅनाईट हटचून तिथे दगडी बांधकाम होणार आहे. याशिवाय नामदेव पायरीच्या महाद्वाराचं आरसीसी काम पाडून तिथेही मूळ मंदिराला शोभेल असं पुरातन दगडानं महाद्वार बनवलं जाणार आहे.
Continues below advertisement