एक्स्प्लोर
Palghar Visit Sanjay Raut राऊत लोकलने पालघरच्या दौऱ्यासाठी रवाना,संपर्क कार्यालयाचं करणार उद्घाटन
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज पालघरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते पालघर जिल्हा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. 'वाहतूक कोंडीत अडकू नये म्हणून लोकलने प्रवास करायचा ठरवलं,' असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. या दौऱ्यात संजय राऊत स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. सुरुवातीला ते सफाळे इथं आपल्या बंधू प्रवीण राऊत यांच्या घरी भेट देतील, त्यानंतर पालघरमध्ये संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करतील. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्यासाठी शिवसेनेचे नेते विविध जिल्ह्यांमध्ये दौरे करत आहेत. या दौऱ्यांमुळे संघटनेची ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही सांगण्यात आलं.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement

















