एक्स्प्लोर
Imtiyaz Jalil On Sangram Jagtap | संग्राम जगतापांचा इम्पियाज जलील यांच्याकडून चिकनी चमेली असा उल्लेख
अहिल्यानगर येथे एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सभा पार पडली. या सभेत ओवैसी यांनी केंद्र सरकारसह राज्य सरकारवर जोरदार टीका केली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी त्यांनी केली. ३० लाख एकर शेतीचे नुकसान झाल्याचे सांगत त्यांनी कर्जमाफीची मागणी केली. सरन्यायाधीशांवरील बूटफेक प्रकरणावरूनही ओवैसींनी सभेतून हल्लाबोल केला. या सभेवेळी 'आई लव्ह मोहम्मद' च्या घोषणाही देण्यात आल्या. ओवैसी यांनी नथुराम गोडसेबद्दल खळबळजनक दावा केला. गोडसेला पकडल्यावर त्याने स्वतःला मुस्लिम म्हटले होते आणि त्याची खतना (सुंता) झाली होती, असे ओवैसी म्हणाले. इम्तियाज जलीलही या सभेला उपस्थित होते. इम्तियाज जलील यांनी संग्राम जगताप यांचा 'चिकनी चमेली' असा उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला. तसेच नितेश राणे आणि पडळकर यांच्यावरही टीका केली. २०२९ च्या निवडणुकीत 'संग्राम' घडवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टीव्ही-नाटक
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
















