Osmanabad : आकाशातून तांबड्या रंगाचा दगड जमिनीवर, उस्मानाबादच्या वाशीमध्ये उल्कापात?

Continues below advertisement

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी गावात एक रंजक वैज्ञानिक घटना घडली आहे. प्रभू माळी नावाचे 65 वर्षाचे शेतकरी रोजच्याप्रमाणे सकाळी लवकरच भाजीपाला आणण्यासाठी शेताकडे गेले होते. भाजी काढणी सुरू करताच आकाशातून आवाज करत एक तांबड्या रंगाचा दगड माळी यांच्या समोर येवून पडला. सुरुवातीला माळी यांना कोणीतरी हा दगड आपल्या दिशेने फेकला असावा , असे वाटले . त्यांनी आसपास आवाज देऊन पाहिले. पण कोणीही नव्हते. यामुळे सुरुवातीला मावशींना भीती वाटली. घाबरत घाबरत माळी यांनी दगडाला हात लावून पाहिल . दगड गार होता. माळी यांनी नंतर तो उचलू आणला आणि तहसीलला जमा केला. उस्मानाबादच्या भुवैज्ञानिकांच्या मते हा उल्कापात आहे. एखाद्या धूमकेतूचा शेपटीचा हा अवशेष असावा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram