OBC Reservation Row: '...नाहीतर मग निवडणुका आहेत तर समोर', Vijay Wadettiwar यांचा सरकारला थेट इशारा
Continues below advertisement
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) सरकारला धारेवर धरले आहे. 'जोपर्यंत हा जीआर रद्द होणार नाही तोपर्यंत ओबीसी स्वस्थ बसणार नाही आणि ओबीसीच्या मनातला जो संभ्रम आहे तो दूर होणार नाही, त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी यावरती लवकरात लवकर अॅक्शन घ्यावी नाहीतर मग निवडणुका आहे तर समोर', असा सज्जड इशारा वडेट्टीवार यांनी सरकारला दिला आहे. २ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयाला (GR) ओबीसी बांधवांकडून तीव्र विरोध होत आहे. हा जीआर रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. या मागणीसाठी ओबीसी बांधव एकत्र येत असून, या आंदोलनातून सरकार जीआर रद्द करण्याचा निर्णय घेईल, अशी आशा लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement