OBC Reservation Row: 'खुर्चीसाठी वाहत जाऊ नका', Wadettiwar यांचा Bawankule यांच्यावर थेट हल्लाबोल

Continues below advertisement
राज्यात ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'ओबीसींचं नुकसान होतंय, खुर्चीसाठी वाहत जाऊ नका,' असा थेट आरोप विजय वडेट्टीवार यांनी बावनकुळे यांच्यावर केला आहे. ओबीसी आंदोलनामुळेच तुम्हाला भाजपमध्ये पुन्हा महत्त्व मिळालं, याची आठवणही वडेट्टीवार यांनी करून दिली. यावर उत्तर देताना, बावनकुळे यांनी संभ्रम निर्माण करण्याऐवजी चर्चेतून मार्ग काढण्यावर भर दिला. गरज पडल्यास ओबीसी संघटनांसोबत बैठक घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहनही बावनकुळे यांनी केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola