एक्स्प्लोर
OBC Reservation Protest | Mumbai मध्ये Kunbi समाजाचा मोर्चा, Nagpur मध्ये OBC चा एल्गार!
मराठा समाजाबाहेरच्या कुणबी समाजाने आरक्षणासाठी मुंबईत धडक दिली आहे. रायगडसह संपूर्ण कोकणातून हजारो आंदोलक आझाद मैदानात एकवटले आहेत. ओबीसी कोट्यात कुणालाही आरक्षण देऊ नये आणि कुणबी समाजाला ओबीसी प्रमाणपत्र न देता आमचं आरक्षण अबाधित ठेवावं, या मागण्या सरकारसमोर मांडल्या जाणार आहेत. याचवेळी उद्या उपराजधानी नागपुरातही ओबीसी समाजाचा मोर्चा निघणार आहे. काँग्रेस आमदार आणि विधीमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघेल. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव सहभागी होतील. उद्या सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान मोर्चाची सुरुवात होईल. महाराष्ट्रातून अनेक ओबीसी नेते या मोर्चामध्ये येणार आहेत. संघर्षामध्ये ओबीसीच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहतील. या मोर्चामध्ये लाखो लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















