OBC Reservation Protest | कुणबी बांधवांचा मुंबईत एल्गार, आरक्षणाचा वाद पेटला

Continues below advertisement
आज मुंबईत ओबीसी समाजाचं मोठं आंदोलन सुरू आहे. रायगडसह संपूर्ण कोकणातून हजारो कुणबी बांधव या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईकडे निघाले आहेत. एसटी बस, खाजगी बस आणि कारने हे बांधव मुंबईत दाखल होत आहेत. आंदोलकांची प्रमुख मागणी आहे की, ओबीसी कोट्यातून कुणालाही आरक्षण देऊ नये आणि कुणबी समाजाला ओबीसी प्रमाणपत्र न देता आमचं आरक्षण अबाधित ठेवावं. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढलेला जीआर (GR) मागे घ्यावा अशीही त्यांची मागणी आहे. आंदोलक स्पष्ट करतात की, "मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं आमचं कुठलं काही म्हणणं नाहीय. त्यांना आरक्षण वेगळ्या पद्धतीनं द्यावं. पण तो आमच्या ओबीसी समाजामध्ये किंवा आमच्या कुणबी समाजातून कोणालाही आरक्षण देऊ नये ही आमची प्रमुख मागणी आहे." हा मोर्चा आझाद मैदानावर धडकणार आहे. मागील काही दिवसांपासून आरक्षणाचा वाद महाराष्ट्रात वाढलेला आहे. कुणबी बांधव मोठ्या संख्येने या लढ्यात उतरले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola