Chhagan Bhujbal OBC Reservation: ओबीसी नेत्यांमध्येच जुंपली, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप
Continues below advertisement
बीडमधील ओबीसी महायल्गार सभेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे, ज्यात मंत्री छगन भुजबळ यांनी आपलेच मंत्रिमंडळातील सहकारी राधाकृष्ण विखे पाटील आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विकार पसरवून गेलाय,' अशा शब्दात भुजबळ यांनी विखे पाटलांवर हल्ला चढवला. याला उत्तर देताना विखे पाटलांनी मात्र समन्वयाची भाषा केली. दुसरीकडे, सरकारच्या जीआर विरोधात समान मागणी असूनही वडेट्टीवार ओबीसी सभांना गैरहजर राहत असल्याचा आरोप भुजबळांनी केला, तर वडेट्टीवारांनी भुजबळांवर भाजपच्या सांगण्यावरून आपल्याला टार्गेट करत असल्याचा प्रत्यारोप केला. मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांची टीका म्हणजे देवेंद्र फडणवीसांना डॅमेज करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. या सर्व आरोप-प्रत्यारोपांमुळे ओबीसी आरक्षणाचा मूळ मुद्दा बाजूला पडून नेत्यांमधील शाब्दिक युद्ध पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement