एक्स्प्लोर
OBC Maha Elgar Sabha in Beed : 'तुमचं शासन भूतकाळी राहील', बीडमधून ओबीसींचा थेट इशारा
बीडमध्ये (Beed) अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वात ओबीसी महाएल्गार सभा (OBC Maha Elgar Sabha) पार पडली. या सभेला धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांचीही प्रमुख उपस्थिती होती. 'जो तुम्ही जीआर काढला तो पूर्णतः रद्द करण्यात यावा, अन्यथा आम्ही ओबीसी सर्व बांधव स्वस्थ बसणार नाही आणि तुमचं शासन भूतकाळी राहील', असा थेट इशारा आंदोलकांनी सरकारला दिला. मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेला 'हैदराबाद गॅझेट'वर आधारित जीआर रद्द करावा, ही या सभेची प्रमुख मागणी होती. मराठवाड्यातील हजारो ओबीसी कार्यकर्ते छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर जमले होते. ओबीसी आरक्षणाला धक्का लागत असल्याचा आक्रोश यावेळी व्यक्त करण्यात आला. धनंजय मुंडे पहिल्यांदाच ओबीसींच्या व्यासपीठावरून बोलणार असल्याने आणि छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांची उपस्थिती मराठवाड्यातील राजकारणासाठी निर्णायक मानली जात आहे.
महाराष्ट्र
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















