OBC Kunbi Reservation | कुणबी एल्गार मोर्चा मुंबईत, आरक्षणाच्या संरक्षणासाठी एल्गार!

Continues below advertisement
कुणबी समाजाने आपल्या आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य आंदोलन पुकारले आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांतील हजारो कुणबी बांधव यात सहभागी झाले आहेत. कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे आणि उपाध्यक्ष शंकरराव मसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याच्या सरकारच्या निर्णयाला कुणबी समाजाचा तीव्र विरोध आहे. हैदराबाद गझटियरच्या आधारावर दिलेल्या निर्णयामुळे कुणबी आरक्षणात घुसखोरी होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. "आमची मागणी अशी आहे की आमच्या ज्या कुणबी समाजामध्ये जी घुसखोरी होतेय ती शासनाने थांबवावी. अगर तुम्हाला त्यांना रिजर्वेशन द्यायचं आहे तो स्वतंत्र रिजर्वेशन द्या," अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे. २ सप्टेंबर रोजी काढलेला जीआर रद्द करण्याची त्यांची मुख्य मागणी आहे. याशिवाय, न्यायमूर्ती शिंदेंची समिती बरखास्त करावी, ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती मिळावी, जातनिहाय जनगणना करावी, श्यामराव पेसे आर्थिक विकास महामंडळास स्वतंत्र दर्जा आणि ५० कोटी रुपये द्यावेत, तसेच कोकणातील कुणबींच्या खोत जमिनीवरील नोंदी कराव्यात अशा विविध मागण्याही त्यांनी मांडल्या आहेत. राज्यभरातून ओबीसी समाज या आंदोलनात एकवटला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola