एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
War of Words: 'जागा आणि वेळ कळव, तिथे येतो मी', Nitesh Rane यांचं Waris Pathan यांना थेट आव्हान
भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) आणि एमआयएम (MIM) नेते वारिस पठाण (Waris Pathan) व इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्यातील राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. 'जागा आणि वेळ कळवायची आणि मग तिथे उभं रहायचं, तिथे येतो मी,' असा थेट इशारा नितेश राणे यांनी वारिस पठाण यांना दिला आहे. अहल्यानगरमध्ये झालेल्या एमआयएमच्या सभेत वारिस पठाण यांनी, 'आएगा तू दो टांग पे मगर जाएगा इंशाअल्लाह स्ट्रेचर के ऊपर,' अशी धमकी राणेंना दिली होती. यानंतर राजकीय वातावरण तापले असून, राणे यांनी 'भोकने वाले कुत्ते काटते नही,' अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले. या सभेत इम्तियाज जलील यांनी राणेंचा उल्लेख 'चिंटू' असा केला होता, ज्यामुळे हा वाद अधिकच चिघळला.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















