World Record : नऊ वर्षाची चिमुकली झाली जगातील सर्वात लहान सतारवादक, 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
Continues below advertisement
अकोल्यातील सौम्या गुप्ता या नऊ वर्षाच्या चिमुकलीची लंडनच्या 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. जगातील सर्वात लहान सतारवादकाचा बहुमान सौम्याला मिळाला आहे. सौम्याचे वडील डॉ. अभिनंदन गेल्या अडीच वर्षांपासून सतारवादन शिकत आहेत. चिमुकल्या सौम्यानंही आपल्या वडिलांसोबत सतार वादनाला सुरूवात केलीय. सौम्यानं दीड वर्षात सतारवादनाच्या शिक्षणात स्वत:ला चांगलच झोकून दिलं. आणि तीनं वर्षातच तिनं जागतिक स्तरावर आपलं नाव कोरलं आहे.
Continues below advertisement