Nilesh Ghaiwal Update : निलेश घायवळच्या घराची झडती, नेमकं काय काय सापडलं?

Continues below advertisement
पुणे पोलिसांनी निलेश घायवळच्या पुण्यातील घराची झडती घेतली. दोन दिवस चाललेल्या या झडतीमध्ये पोलिसांना चाळीसहून अधिक कागदपत्रे जप्त केली. यामध्ये मराठवाड्यातील विविध ठिकाणी खरेदी केलेल्या जमिनींशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. ही जमिनींची खरेदी-विक्री पवनचक्क्यांच्या संदर्भातली असून, पवनचक्की कंपन्यांच्या आसपासच्या जमिनींची कागदपत्रे पोलिसांना मिळाली आहेत. यासोबतच, घायवळच्या घरातून पोलिसांना अनेक जिवंत काडतुसं, बुलेट्स आणि कार्ट्रेज सापडले. ही काडतुसं अवैध असल्याने निलेश घायवळवर Ammunition Act अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश घायवळ सध्या फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या झडतीमुळे घायवळच्या आर्थिक व्यवहारांची आणि अवैध कृत्यांची व्याप्ती समोर आली आहे. मंदार गोंजारी यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola