NCP Vidhan Parishad Candidate List : राष्ट्रवादीच्या विधानपरिषदेसाठी झिशान सिद्दीकी, उमेश पाटील, संजय दौंड यांचे नाव आघाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता आहे.. आज दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरीवर बैठक होणार आहे.. कोअर कमिटीने निश्चित केलेल्या नावांपैकी काही नावांवर चर्चा होऊन बैठकीनंतर उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात येणार आहे... विधान परिषदेसाठी झिशान सिद्धकी, संजय दौंड, उमेश पाटील यांच्याकडून कागदपत्रे गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्यात..
हे देखील वाचा
Yugendra Pawar: युगेंद्र पवार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत? माळेगाव साखर कारखान्याची लढाई रंगतदार होण्याची शक्यता
बारामती: राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक घडामोडी घडल्या. राज्यातील दोन मोठे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांमध्ये एकाच कुटूंबातील व्यक्ती एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले त्यामध्ये लोकसभेला मतदारांनी शरद पवारांना साथ दिली तर विधानसभेला अजित पवारांना साथ दिली त्यानंतर आता पुन्हा एकदा पवार विरूध्द पवार अशी लढत माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दिसण्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा पवार विरूध्द पवार अशी निवडणूक होण्याचे संकेत दिसून येत आहेत.
काय म्हणालेत युगेंद्र पवार?
आमच्याकडे ना संस्था आहेत, ना सत्ता आहे आणि ना पैसा आहे. तरीही पक्षफुटीनंतर कार्यकर्ते आमच्यासोबत राहतात, ही सोपी गोष्ट नाही. कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आम्हाला ठामपणे त्यांच्यामागे उभे राहावे लागेल. सक्षम उमेदवार मिळत असतील आणि माळेगावचा छत्रपती होऊ द्यायचा नसेल तर निवडणूक लढवावी लागेल, अशा शब्दांमध्ये युगेंद्र पवार यांनी माळेगाव कारखाना निवडणुकीच्या राजकीय मैदानात उतरण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर माळेगावमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत रंगण्याची शक्यता आहे.