एक्स्प्लोर
Maharashtra Politics: 'दोन वर्षात मंत्री बनवतो', Ajit Pawar यांनी शब्द दिला, Dharmarao Atram यांचा गौप्यस्फोट!
गडचिरोलीमध्ये (Gadchiroli) झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धर्मराव आत्राम (Dharmarao Atram) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. 'दोन वर्षात मंत्री बनवतो असा शब्द अजित पवारांनी दिला', असं धर्मराव आत्राम यांनी स्पष्टपणे सांगितलं. याच कारणामुळे आपण थांबलो आहोत, असंही ते म्हणाले. आगामी नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीचाच (Mahayuti) अध्यक्ष निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आपल्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे हाच आपला मुख्य मुद्दा असून, जो व्यक्ती काम करतो तिथेच लोक येतात, असंही आत्राम यांनी नमूद केलं.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















