NCP Lavani Row: 'लावणी ही महाराष्ट्राची आनबानशान', Shilpa Shahir यांच्या नागपूरमधील कार्यक्रमावर NCP आक्रमक
Continues below advertisement
नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमात लावणी सादर झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. 'लावणी ही आपली महाराष्ट्राची आनबानशान आहे आणि अश्या महिला आपल्यासोबत जुळलेल्या आहेत,' असं म्हणत एका स्थानिक महिला पदाधिकाऱ्याने या कार्यक्रमाचे समर्थन केले आहे. लावणी सादर करणाऱ्या कलाकार शिल्पा शाहीर (Shilpa Shahir) याच पक्षाच्या पदाधिकारी असून त्यांची नागपूर शहराच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याचेही या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले. आमच्या दिवाळी मिलन कार्यक्रमात प्रत्येक महिलेने नृत्य, संगीत सादर करून आपले गुण दाखवले, असे सांगत पक्षाने या आयोजनाची बाजू उचलून धरली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement