NCP Rift: 'हिरवे साप ठेचले पाहिजेत', आमदार Sangram Jagtap यांच्या विधानामुळे Ajit Pawar गटात खळबळ

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आला आहे. आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या परस्परविरोधी भूमिकांमुळे पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाने नोटीस बजावूनही, 'हिरवे साप ठेचले पाहिजेत,' असे वादग्रस्त विधान संग्राम जगताप यांनी पुन्हा केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. दुसरीकडे, मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारविरोधी भूमिका घेतली असून आपली भूमिका अजित पवारांना माहीत असल्याचा दावा केला आहे. भुजबळांच्या मते, त्यांना मत मांडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी, 'समाजात तणाव निर्माण होईल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे,' अशी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे अजित पवारांना पक्ष सांभाळताना अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola