Pune Politics: 'हिंदू-मुस्लिम भाई भाई, सर्वांचं रक्त लाल', NCP नेते दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य
Continues below advertisement
पुण्यातल्या शनिवारवाडा (Shaniwarwada) प्रकरणावरून राजकारण तापलेलं असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्यावर महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे. 'हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या सगळेजण आपण भाई भाई आहोत, सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचं रक्त शेवटी लाल आहे', असं म्हणत भरणेंनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर टीका केली. पुण्यातील शनिवारवाडा येथे काही महिलांनी नमाज पठण केल्याच्या व्हिडिओनंतर वाद निर्माण झाला होता, ज्यावर भरणे यांनी ही प्रतिक्रिया दिली. मुस्लिम समाजाला पुढे घेऊन चला असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. अजितदादा पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची भूमिका नेहमीच रोखठोक राहिली आहे आणि मुस्लिम समाजाविरोधात भूमिका घेणाऱ्यांना दादांनी चोख उत्तर दिलं आहे, असंही भरणे म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement