NCP Infighting: 'कुणाच्या बापाला घाबरत नाही', Rupali Thombre यांचं Rupali Chakankar यांना थेट आव्हान!
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि रुपाली ठोंबरे-पाटील (Rupali Thombre-Patil) यांच्यात संघर्ष पेटला आहे. 'ही पोस्ट करायला प्रवृत्त करणाऱ्या रुपाली चाकणकर आणि त्यांची टीम आहे, त्यांचाही पर्दाफाश झाला पाहिजे', असा थेट आरोप रुपाली ठोंबरे यांनी केला आहे. पुण्यातील माधवी खंडाळकर नावाच्या महिलेने फेसबुक लाईव्ह करून रुपाली ठोंबरे यांनी गुंड पाठवून मारहाण केल्याचा आरोप केला होता, पण नंतर त्यांनी गैरसमजातून हे घडल्याचे सांगत माघार घेतली. यानंतर, रुपाली ठोंबरे यांनी हा सर्व प्रकार रुपाली चाकणकर यांनीच घडवून आणल्याचा आरोप केल्याने अजित पवार (Ajit Pawar) गटातील गटबाजी समोर आली आहे. या दोन नेत्यांमधील वाद अजित पवारांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement