NCP Infighting: 'कुणाच्या बापाला घाबरत नाही', Rupali Thombre यांचा Rupali Chakankar यांना थेट इशारा

Continues below advertisement
अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अंतर्गत वाद पेटला असून, रुपाली ठोंबरे-पाटील (Rupali Thombre) आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) पुन्हा एकदा आमनेसामने आल्या आहेत. 'माधवी खंडाळकर यांना आरोप करणारा व्हिडिओ काढण्यासाठी रुपाली चाकणकर आणि त्यांच्या टीमने प्रवृत्त केलं, यांचा पर्दाफाश झाला पाहिजे', असा थेट आरोप रुपाली ठोंबरे यांनी केला आहे. सुरुवातीला माधवी खंडाळकर नावाच्या महिलेने रुपाली ठोंबरेंनी गुंड पाठवून मारहाण केल्याचा आरोप करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. मात्र, काही तासांतच त्यांनी यू-टर्न घेत हा गैरसमजातून घडलेला कौटुंबिक वाद असल्याचे सांगितले. यानंतर, ठोंबरेंनी आक्रमक पवित्रा घेत आपल्यावरील आरोप हे चाकणकरांनी रचलेले राजकीय षडयंत्र असल्याचा दावा केला आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola